शेतकऱ्यांची फसवणूक; रब्बी ज्वारीची कणसे दाण्यांविना

शेतकऱ्यांची फसवणूक; रब्बी ज्वारीची कणसे दाण्यांविना
Farmer
FarmerSaam tv

कापडणे (धुळे) : धुळे तालुक्यातील दापुरा, दापुरी व लामकानी परिसरातील शिवारातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतातील एका कंपनीच्या हिवाळी बागायती रब्बी ज्वारी ३२०१ या वाणाची पेरणी केली होती. चक्क चार महिने उलटूनही ज्वारीच्या कणसांमध्ये दाणेच भरले गेलेले नाहीत. शेतकऱ्यांची (Farmer) संबंधित कंपनीने मोठी फसवणूक केली आहे. साहेब, आता आम्ही काय करावे, आता तुम्हीच न्याय द्या, अशी आर्त कळकळीची विनंती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. (dhule news Fraud of farmers Rabbi hangam grains without seeds)

Farmer
नंदुरबार : महाशिवरात्रीच्या प्रसादातून १३४ जणांना विषबाधा

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना दिलेल्या निवेदनात (Dhule News) म्हटले आहे. दुकानदार व संबंधित कंपनीने उत्पादनाची तोंडी हमी दिलेली होती. कणसांना दाणे आले नसल्यामुळे दुकानदार व कंपनी यांनी फसवणूक (Fraud) केली आहे. खरिपाचा हंगाम सुरवातीला पाऊस नसल्यामुळे व शेवटी अतिपावसामुळे बोंबलला. आता सर्व काही रब्बीवर आशा होत्या. त्याही संपल्या आहेत.

भरपाईची मागणी

मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनीने उत्पादनाएवढी भरपाई द्यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी विनोद पाटील, किरण पाटील, पुंडलिक पाटील, रावसाहेब पाटील व विनायक पाटील यांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे भोसले यांनाही निवेदन पाठविले आहे. धुळे तालुक्यातूनही अशा प्रकारच्या बऱ्याचशा तक्रारी पुढे येत असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com