कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा फटका

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा फटका
कांदा
कांदा

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सतत होत असलेल्या हवामान बदलाचा फटका आता कांदा पिकावर होताना दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील तब्बल तीन महिने वरुणराजाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी मोठ्याप्रमाणात कसरत करावी लागली. परंतु त्यानंतर पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्याने कसेबसे जतन केलेले पिक पूर्णतः उध्वस्त झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून उनच नसल्यामुळे बरेचसे पीक सडून गेले तर बहुतांश कांदा पिकावर करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. (dhule-news-climate-change-onion-crop-production-impact)

जमिनीतुन पुरक खते व महागड्या बुरशीनाशकांच्या फवारण्याही मोठ्या प्रमाणात चालू आहेत. शिरपुर तालुक्यातील त-हाडी वरूळ परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याला कांदा पीक वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतांना देखील लावलेला कांदा तग धरत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा लागवडीत ना़ंगर घालण्याची वेळ आली आहे.

कांदा
जिल्हा परिषद पोटनिवडणुक; पंधरा गटातून १०७ तर तीस गणातून १८० उमेदवारी अर्ज

निम्‍मे क्षेत्राचे नुकसान

शिरपूर तालुक्यात जवळपास २०० हेक्टरवर कांदा पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु त्यापैकी १०० हून अधिक हेक्‍टरवर कांदा पिकाचे हवामानबदलामुळे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com