मराठवाडा चिंतेत; दाेन दिवसांत तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

farmer
farmer

बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत दोन दिवसांत दाेन युवा शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्याने farmer आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एक शेतकऱ्यानी आत्महत्या केली आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील बीड beed जिल्ह्यास बसला आहे. शेती आणि शेतकऱ्यांचे खूप माेठे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. पंचनाम्याचा फार्स आणि आश्वासनांची खैरात यामध्ये शेतकरी अडकला आहे.

farmer
नाद खूळा! कस्तुरी सावेकरने माऊंट मनस्लूवर फडकवला तिरंगा

आर्थिक अडचणीमुळे शेतक-यांपुढे, आता जगावे कसं ? असा प्रश्न पडला असून त्यातूनच काही शेतकरी आत्महत्या करु लागले आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण diwali festival 2021 आला आहे. रब्बीचा हंगाम सुरू होत आहे, यामुळे आता येणारा सणवार कसा करावा? घेतलेलं कर्ज कुठून फेडावं ? रब्बीसाठी बियानं कुठून आणावं ? वाहून गेलेलं शेत पुन्हा कसदार कसं बनवावं ? या एक ना अनेक संकटाने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

बीड जिल्ह्यात गत काही दिवसात ज्येष्ठ शेतक-यांसह युवा शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये युवा शेतकरी बाळासाहेब रामलिंग गित्ते, सिद्धेश्वर धर्मराज फरताडे आणि ज्येष्ठ शेतकरी नागोराव धोंडिबा शिंदे यांनी आत्महत्या केली. सरकारने आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. शेतकरी वर्गाच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठाेस पाऊल उचलण्याची गरज आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com