अकोल्यात शिवसेनेचा पूरग्रस्तांसाठी मोर्चा; बेशरमच्या झाडासह काढला मोर्चा

अकोल्यात शिवसेनेचा पूरग्रस्तांसाठी मोर्चा; बेशरमच्या झाडासह काढला मोर्चा
Shiv sena
Shiv sena

अकोला : पुर पिडितांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरेंनी बेशरम झाडाच्या कुंड्या घेऊन अनोख्या प्रकारे हे आंदोलन केले.

अकोल्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोल्यातील अनेकांच्या घराचे अतोनात नुकसान झाले. घरातील धान्य, कपडे, घरातील वस्तू वाहून गेल्या अशा पूरग्रस्तांना आतापर्यंत त्याचा हक्काचा सहायता निधी देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला.

Shiv sena
कापसाला भाव पण..शेतकरी हतबल; करताय कपाशी नष्‍ट

सहाय्यता निधीत भ्रष्‍ट्राचार

किती पूर पीडितांच्या सर्वे झाला. किती लोकांना सहायता निधी मिळाला याची यादी सुद्धा प्रशासन प्रसिद्ध करीत नाहीत. त्यामुळे सहायता निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. मोर्चा मध्ये अकोल्यातील शिवसेना वसाहत मधील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेशरमच्या झाडाच्या कुंड्या लावण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com