वांग्याच्या पिकातून खर्चही निघेना, वैतागलेल्या शेतकऱ्यानं असं काही केलं की..

वांग्याच्या पिकातून खर्चही निघेना, वैतागलेल्या शेतकऱ्यानं असं काही केलं की..
Farmer
FarmerSaam tv

अकोला : शेतात लावलेल्‍या वांगी पिकातून खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर हताश होण्याची वेळ आली. त्यामुळे उद्विग्न झालेल्या अकोल्यातील बोर्डी येथील शेतकऱ्याने (Farmer) उभ्‍या पिकात गुरांना वाट मोकळी करून दिली. (akola news farmer Eggplant crop was abandoned by cattle)

Farmer
ऑनलाईन मुलाखत पडली महागात; लिंक ओपन करताच बँक खात्‍यातून रक्‍कम गायब

अकोला (Akola) जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या बोर्डी गावातील शेतकरी प्रदीप ताडे यांनी शेतीत काहीतरी वेगळे प्रयोग करावे या हेतूने वांग्याचे पीक घेण्याचे ठरविले. त्यानुसार एक हेक्टरवर ८० ते ९० हजार रुपये खर्च करत वांग्याच्या पिकाला जपले. परंतु, वांग्‍याचे उत्‍पादन येण्यास सुरवात झाली व शेतकरी देखील हताश झाला.

पिकात सोडले गुरे

वांग्‍यासाठीचा उत्पादन खर्च जास्त आणि बाजारपेठेत वांग्याला भाव कमी मिळाल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि काढणी मजुरी खर्चही निघणे मुश्कील झाले. यामुळे संतापाच्या भरात एक हेक्टर पिकात गुरांना सोडून उभे वांग्याचे पीक जमीनदोस्त केले. वांगे उत्पादक शेतकऱ्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com