इटलीत कोरोना व्हायरसच्या भीतीने घरातच राहणं लोक पसंद करतायत.चीननंतर कोरोना व्हायरसचा जास्त धोका इटलीमध्ये निर्माण झालाय.त्यामुळं खबरदारी म्हणून इटलीतील लोकांनी घरीच राहणं पसंद केलंय.इटलीत 12,500 पेक्षा जास्त कोरोनाचे संशयित पेशंट आहेत.त्यामुळं कुणीही घराबाहेर पडत नाहीये.रस्ते शहरं ओस पडलीयत.लोक ऑफिसला न जाता घरीच राहतायत.त्यामुळं आता अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत.घरी बसून कंटाळा येत असल्याने लोक स्वत:चं मनोरंजन म्हणून गाणी गातायत.
बाल्कनीत उभे राहून लोक गाणी गातायत.कुणी गिटार वाजवतंय.कुणी म्युजिकल इंस्ट्रूमेंट वाजवतंय तर कुणी डान्स करतंय.काहीजण हे सगळं पाहण्यात दंग झालेयत.इटलीत कोरोनाचा प्रसार जास्त झालाय.त्यावर नियंत्रण आणण्यासाठी घरातच राहणं खबरदारीचं बोललं जातंय.त्यामुळं घरी राहून कंटाळा येत असल्याने मनोरंजन म्हणून असे प्रयोग केले जातायत.
यात वयोवृद्धही मागे राहिलेली नाहीत.चक्क बाल्कनीत उभी राहून डान्स करत होती.कोरोनामुळे घराबाहेर पडण्याची कुणाचीही हिंमत होत नाहीय.त्यामुळं सगळेजण घरीच राहून जसं जमेल तसं आपलं मनोरंजन करतायत.आपणंही अशीच स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
web title : viral satya italy corona work from home entertainment
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.