सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय.A रक्तगटातील व्यक्तींना अधिक धोका असल्याचा दावा केलाय.तर O रक्तगटातील लोकांना इतर रक्तगटातील व्यक्तींपेक्षा धोका कमी असाही दावा केलाय. व्हायरल मेसेजमधील दावा कितपत खरा आहे ? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केला वाचा सविस्तर.
हा मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय.ज्यांचा A रक्तगट आहे त्यांना धास्ती वाटू लागलीय.त्यामुळं या व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.याबद्दल अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात.आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्याकडून या रक्तगटांबद्दल माहिती जाणून घेतली.
या व्हायरल मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं.अनेक आजारांशी रक्तगटाशी संबंध असतो हे खरं आहे.पण, A रक्त गटाला धोका आणि O रक्तगटाला धोका नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही- डॉ. अजय दंडे, तज्ज्ञ
त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.
कोरोनामुळे कोणीही काहीही मेसेज व्हायरल करतोय.जरी O रक्तगट असला तरी तुम्ही कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहात असा नाही.काळजी घ्या आणि कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करा.आमच्या पडताळणीत A रक्तगटाला अधिक धोका असतो हा दावा असत्य ठरला.
Web title : viral satya A blood group riski corona virus
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.