वाचा| शरद पवार जाणार कोकण दौऱ्यावर,वाचा कसा असेल कोकण दौरा 

वाचा| शरद पवार जाणार कोकण दौऱ्यावर,वाचा कसा असेल कोकण दौरा 

 मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगडसाठी १०० कोटींचे आणि रत्नागिरीसाठी ७५ कोटींचे तर सिंधुदुर्गसाठी २५ कोटींचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोकणचा पाहणी दौरा केला असून, सध्या परिवहन मंत्री अनिल परब हेही कोकणच्या दौऱ्यावर आहेत.निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात खासकरून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील घरांचे, मच्छिमारांचे तसेच फळबागा व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीची पाहणी करून कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आज, मंगळवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या नुकसानीची पाहणी शरद पवार करणार आहेत.

आज, मंगळवारी सकाळी ८.३० वाजता शरद पवार हे मुंबईतून मोटारीने प्रयाण करणार आहेत.

सकाळी ११.३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, दुपारी १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन आदी भागांची पाहणी करतील.

त्यानंतर आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतील.

सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे ते मुक्काम करणार आहेत.

कसा असेल १० जून रोजी दौरा


रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची ते पाहणी करतील. दापोलीतील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रत्नागिरीतील काही गावांना ते भेटी देऊन येथील स्थानिकांशी चर्चा करतील. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.

WebTittle:: Read | Sharad Pawar will go on Konkan tour, read how Konkan tour will be


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com