करोनाचे विषाणू जवळपास तीन तास हवेत जिवंत राहत असल्याने एक असा फिल्टर तयार करण्याची योजना होती जो विषाणूंना लवकरात लवकर संपवेल आणि जगभरात पुन्हा एकदा कामकाज सुरु करण्याच्या दृष्टीने बंद ठिकाणी विषाणूंवर नियंत्रण मिळवेल असं संशोधकांनी सांगितलं आहे.
“हे उपकरण सर्वात आधी शाळा, रुग्णालयं, विमान, कार्यालयीन इमारती, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक ठिकाणी देण्यात येईल,” अशी माहिती एअर फिल्टरच्या निर्मितीसाठी युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनसोबत भागीदार असणारे मेडिकल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी मेडिस्टारचे गॅरेट पील यांनी दिली आहे. अभ्यासानुसार, करोनाचे विषाणू ७० डिग्री सेल्सिअस तापमानात टिकत नाहीत. त्यामुळे एअर फिल्टरचं तापमान २०० डिग्रीपर्यंत वाढवून करोनाचे विषाणू संपवले जाऊ शकतात.
रिपोर्टनुसार, हे उपकरण तयार करणारे संशोधक याचं डेस्कटॉप मॉडेलही तयार करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. जेणेकरुन हे मॉडेल्स मोठ्या व्यवसायिक कार्यालयांमध्ये वापरली जाऊ शकतात. हे मॉडेल कर्मचाऱ्यांना शेजारील हवा करोनामुक्त ठेवण्यात मदत करेल.
हे फिल्टर तयार करणाऱ्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, ज्या ठिकाणी एसीचा वापर केला जातो तेथील हवेत करोनाचे विषाणू बराच वेळ जिवंत असतात. अशा परिस्थितीत जर डेस्कटॉप फिल्टर मॉडेल विकसित केलं तर जगभरात बंद पडलेली कार्यालयं सुरु करण्यात तसंच व्यवसाय क्षेत्राला पुन्हा एकदा गती मिळण्यात यश मिळेल.
जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असताना संशोधकांनी हवेतच करोनाचे विषाणू मारण्यास सक्षम असणारं एअर फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे. हे फिल्टर हवेतील करोनाचे विषाणू वेगळे करुन त्यांना नष्ट करतं असा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांच्या नव्या शोधामुळे बंद ठिकाणी म्हणजेच शाळा, रुग्णालयं, कार्यालयं शिवाय विमानांमध्ये करोनाचा फैलाव रोखण्यात मदत मिळू शकते. मटेरिअल्स टुडे फिजिक्स या जर्नलमध्ये या अभ्यासाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अभ्यासात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या एअर फिल्टरमधून एकदा गेलेल्या हवेतून ९९.८ टक्के करोना विषाणू मारले गेले. हे उपकरण निकेल फोमपासून तयार करण्यात आले असून ते २०० डिग्री सेल्सियसपर्यंत तापते. त्यामुळे अँथ्रॅक्स आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ९९.९ टक्के जिवाणूंचा हे उपकरण नाश करतं. “हे फिल्टर विमानतळ तसंच विमानांमध्ये, ऑफिस, इमारती, शाळा आणि क्रूझ अशा ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यात उपयोगी असेल,” असं अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनचे अभ्यासातील सह-लेखक झिफेंग रेन यांनी म्हटलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याची या फिल्टरची क्षमता समाजासाठी फार उपयोगी होईल असंही ते म्हणाले आहेत.
WebTittle :: Read exactly | Now new to curbing Corona
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.