सहा वर्षे डांबून ठेवलेल्या मनीषाची झाली सुटका...मनीषा येणार शिक्षणाच्या प्रवाहात

Raigad Girl Rescued from Brick Klin Contractor
Raigad Girl Rescued from Brick Klin Contractor
Published On

रायगड : संघर्ष कन्या कु. मनीषा तुळशीराम पवार वय वर्ष दहा. ह्या मुलीच्या जीवनातील संघर्ष पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल. वयाच्या चौथ्या वर्षी कोळसा वीटभट्टी कंत्राटदाराने डांबून ठेवलेल्या मनीषाची सहा वर्षांनी संघर्षमय सुटका झाली व तिच्या आई वडिलांची,भावंडाची भेट झाली. Raigad Girl Rescued from Brick Klin Contractor

रोहा Roha तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे आदिवासीवाडी येथील तुळशीराम बाब्या पवार यांना त्याच्या कुटुंबासमवेत सहा वर्षांपूर्वी पाथर्डी अहमदनगर Ahmednagar येथील कंत्राटदाराने मजूर Labourer म्हणून घेऊन गेले. वर्षभर काम केल्यानंतर हे कुटुंब पुन्हा आपल्या गावी परत यायला निघाले तेंव्हा कंत्राटदाराने, 'तुम्ही इथेच कायम कामासाठी राहा असा दबाव आणला. पण ह्या कुटुंबाला ते मान्य नव्हते. तेव्हा त्या कंत्राटदाराने चार वर्षाच्या चिमुकल्या मनीषाला डांबून ठेवले व पवार कुटुंबीयाना हुसकावून लावले. त्यानंतरच्या काळात अनेकदा तुळशीराम पवारने मनीषाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही.

नंतर मनीषाला कर्नाटक Karnataka राज्यात कंत्राटदाराच्या लहान मुलांचा सांभाळ करायला पाठवले. ज्या वयात हातात पाटी पेन्सिल घ्यायची Education त्या वयात मनिषाच्या वाट्याला आईवडिलांपासून दूर व कोंडीत राहावं लागत होतं. तब्बल सहा वर्षानंतर कुठल्याच मार्गाने आपल्या मुलीची सुटका होत नाही, असे मजल्यावर हताश झालेल्या तुळशीराम पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते सोपान सुतार ( रायगड जिल्हाध्यक्ष,सर्वहार जनआंदोलन संघटना ) यांना हा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सुतार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस स्थानकात सम्पर्क करून कंत्राटदाराचा सम्पर्क मिळवला. Raigad Girl Rescued from Brick Klin Contractor

सदर मुलीला कर्नाटक Karnataka राज्यातील चित्रदुर्ग Chitrdurg जिल्ह्यात कोळसा Coal कामावर डांबून ठेवल्याचे उघड झाले. हा सगळा प्रकार पाथर्डी पोलिस यांना फोन वर सांगितल्यानंतर पातर्डी पोलिसांनी Police आंबेवाडी गावात जाऊन चौकशी केली असता, ती मुलगी तिथे असल्याचे आढळून आले. त्या नंतर पोलिसांनी त्या कंत्राटदाराला दम दिल्यास तो कबूल झाला व त्याने चित्रदुर्ग जिल्ह्यातून त्या मुलीला कोकणात रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली आदिवासीवाडीवर सोडले.

पोलिसांच्या मदतीने सोपान सुतार यांनी तब्बल सहा वर्षानंतर कर्नाटक राज्यात कोळसा कामावर ठेवलेल्या दहा वर्षीय मनीषाची सुटका केली. मनीषा आपल्या आईवडीलापासून ६ वर्षांपूर्वी दूर झालेली लेक जेंव्हा घरी आली, तेव्हा पवार कुटुंबियांना खूप आनंद झाला. आई,वडील व आपल्या इतर चार भावंडाना भेटून मनिषाच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता. Raigad Girl Rescued from Brick Klin Contractor

मनीषा ला शाळेबद्दल विचारलं  ती म्हणाली, 'मला शाळेत जायची खूप इच्छा आहे पण तिकडे आमचा शेठ मला त्यांच्या मुलांना सांभाळायला लावायचा. त्यामुळं मी शाळेत नाही गेले'. मनिषाच्या बालपणीची सहा वर्षे खूप संघर्षात गेली आहेत व तिची शिक्षणाची आवड पाहता तिला शाळेत दाखल करून घेण्यात येत आहे. आरटीई RTE कायद्याने मनीषाला वयानुरूप समक्षक इयत्ता चौथीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याने तिचा शिक्षणाचा मार्ग खुला झाला आहे.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com