कोरोनाचा बंद! आजपासून 'या' गोष्टीही राहणार आहेत बंद

ac local 960
ac local 960
Published On

राज्यात गुरुवारी नव्याने 3 कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 49वर पोहोचली आहे. दुबईहून 51 वर्षीय व्यक्ती 3 मार्च रोजी अहमदनगरमध्ये आली होती. त्यानंतर झालेल्या टेस्टमध्ये तो कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं. याआधी ब्रिटनहून मुंबईत परतलेल्या 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्यावर सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उल्हासनगरमध्ये एकोणपन्नास वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.  दरम्यान आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बंद असणार आहेत.

एसी लोकल बंद

मुंबईत आजपासून एसी लोकल बंद असणार आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेसह मध्य आणि हार्बर रेल्वेवर सुद्धा 31 मार्चपर्यंत एसी लोकल धावणार नाहीत.

नवी मुंबई, पनवेल बंद

नवी मुंबई,पनवेलमधील दुकानं आजपासून बंद करण्यात येणार आहेत. नवी मुंबई, पनवेल महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत फेरीवाले, खाऊ गल्ली, स्पा आणि सलूनही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डबा बंद

कोरोनाच्या धोक्यामुळे मुंबईतील डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 20 तारखेपासून 31 मार्चपर्यंत ही सेवा बंद असेल. डबेवाला संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आलाय.  

मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला सहकार्याचं आवाहन केलं आहे.  सर्वच सरकारी यंत्रणा करोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. आता राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं.  प्रसंगी सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं, पण ती वेळ आणू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलंय.

पाहा व्हिडीओ - 

mumbai panvel navi mumbai dabewala maharahstra corona virus covid 19 international strike closed down marathi shut down lock down

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com