टिटवी हा पक्षी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. तिच्या जोरदार आणि सततच्या ओरडण्यामुळे अनेकदा लोकांच्या मनात भीती किंवा कुतूहल निर्माण होतं. पण तिचा आवाज ऐकणं शुभ की अपशकून जाणून घ्या.
लोककथांमध्ये टिटवीचा आवाज अपशकुन मानला जातो. पण प्रत्यक्षात ती नैसर्गिकरित्या धोक्याची सूचना देणारा पक्षी आहे.
साप, कुत्रा, माणूस, आग किंवा इतर कोणताही धोका दिसला की टिटवी सतत ओरडते. यामागचा हेतू स्वतःच्या आणि पिलांच्या सुरक्षेचा असतो.
टिटवीचा आवाज ऐकू आला तर आसपास काहीतरी हालचाल किंवा धोका असू शकतो. म्हणूनच ग्रामीण भागात टिटवीला निसर्गाचा अलार्म मानलं जातं.
टिटवी झाडावर नाही तर थेट जमिनीवर अंडी घालते. त्यामुळे पिल्लांना धोका वाढतो आणि म्हणूनच ती जास्तच सावध असते.
टिटवीच्या अंड्यांतून साधारण ३० दिवसांत पिल्लं बाहेर येतात. या काळात टिटवी खूप आक्रमक आणि सतर्क राहते.
किडे, मुंग्या, लहान कीटक हे टिटवीचं मुख्य अन्न आहे. त्यामुळे ती शेतीसाठी उपयुक्त पक्षी मानली जाते.
टिटवीचा आवाज अपशुकन नसून तिच्या नैसर्गिक वर्तनाचा भाग आहे. अंधश्रद्धेपेक्षा निसर्ग आणि विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे.