बीडमध्ये बोगस एचआरसीटी स्कोअर देणारे रॅकेट?..वंचित म्हणते अशी केंद्रं फोडू

Vanchit Aghadi Warns against Bogust HRCT Reports
Vanchit Aghadi Warns against Bogust HRCT Reports

बीड : बीडमध्ये Beed बनावट रेमडेसिविर Remdisivir इंजेक्शनचा प्रकार कालच उघडकीस आला असतांना, आता बोगस एचआरसीटी स्कोअर देत असल्याचा प्रकार देखील समोर आलाय.हा सर्व प्रकार वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी समोर आणला असून याविषयीची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय.Vanchit Aghadi Warns Against Bogus HRCT Report Centers

जिल्हाधिकाऱ्यांना District Collector दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की डोंगरे नामक महिला या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.त्यांचा जिल्हा रुग्णालयात एचआरसीटी स्कोअर तपासला असता ३ स्कोअर दिला होता.त्यांचा शहरातील शिवाजीराव हार्टकेअर सेन्टरमध्ये एक्सरे काढला असता नॉर्मल आला.पुन्हा त्याच शहरातील unique advance सिटी सेन्टरमध्ये एचआरसीटी  HRCT स्कोअर तपासणी केली असता १० स्कोअर दिला.हा सर्व प्रकार केवळ १ ते २ तासात झालाय, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय

दरम्यान अशा स्वरूपाचे बोगस एचआरसीटी स्कोअर देणारे रॅकेट Racket बीडमध्ये असण्याची शक्यता असून यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक शोषण सुरू आहे.यामुळं ज्यांनी बोगस अन चुकीचे रिपोर्ट दिले आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एचआरसीटी सेंटर फोडू.असा सज्जड इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिलाय...!

Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com