कोरोनाचा सर्वाधिक फटका 'फ्रंट लाईन'वरच्या पोलिसांना!

Police Suffering Badly in Corona
Police Suffering Badly in Corona

मुंबई : लाॅकडऊनमध्ये  Lock Down 'फ्रंट वाँरियर' म्हणून काम करणाऱ्या पोलिसांना Police कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाने पोलिस दलातील ४२७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. Police in Maharashtra Suffering Badly during Corona

गेल्या वर्षी सरकारने Maharashtra Government कोरोना काळात ड्युटी बजावताना संसर्ग होऊन शहिद होणाऱ्या पोलिसांना प्रत्येकी ५०लाख रुपये,  व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे जाहीर केले होते. मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे जाऊन पोलिस कल्याण निधीतूनही Police Welfare Fund १०लाख जाहीर केले होते.

हे देखिल पहा -

असे असतानाही या वर्षी मृत झालेल्या पोलिसांच्या वारसांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या वर्षात महाराष्ट्र पोलिस दलातील १०४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला. नुसत्या एप्रिल महिन्यात ६८पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सरासरी १२ अशी राज्यात मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आहे. Police in Maharashtra Suffering Badly during Corona

मात्र, गेल्या वर्षी कोरोनाने शहिद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ही मदत मिळाली. मात्र या वर्षात ५ महीने उलटूनही शहिद पोलिसांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नसल्याचं वास्तव समोर आलं आहे.
Editd By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com