चाकणच्या ठाकरवाडीतील महिलांचा पाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास..

Women in Chakan facing trouble for water
Women in Chakan facing trouble for water

चाकण : चाकणमधील Chakan रोहकल ठाकरवाडी येथील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी लोकवस्तीपासुन एक किलोमीटर पर्यत पायपिठ करावी लागते. एकावर एक असे तीन हंडे घेऊन महिला पाण्यासाठी Water रस्त्यालगत पायपीट करत आहेत. Women in Chakan Thakarwadi Facing Problems for Water

मात्र रोहकल येथील या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अपघाताचा मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत महिला जीवधोक्यात घालुन पाण्यासाठी धडपड करत आहेत. अपघाताचा Accident धोका असल्याने या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा स्पिडब्रेकर Speed Breakers बसविण्याची मागणी करण्यात येत आहे

चाकण औद्योगिक वसाहतीचा Chakan MIDC विकास झपाट्याने वाढत असताना या परिसरात मात्र आजही पाण्यासाठी महिलांची फरपट सुरु आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा अजुनही उतरला नसल्याचे धक्कादायक वास्तव पहायला मिळत आहे. अशातच डोक्यावर हंडा घेऊन रस्त्यावरच्या बाजुने जात असताना भरधाव वेगाने जाणारी वाहने अपघाताचे आमंत्रणच देत असल्याने महिलांची पाण्यासाठीची ही वणवण जीवघेणीच आहे.Women in Chakan Thakarwadi Facing Problems for Water

चाकण जवळील रोहकल ठाकरवाडी येथील महिलांना पाण्यासाठी वाकी चाकण रोडवरील हातपंपावर यावं लागतं. या ठिकाणावरुन लोकवस्तीपर्यतचा एक किलोमीटर प्रवास डोक्यावर हंडा घेऊन करावा लागतो. या दरम्यान रस्त्याच्या बाजुने जात असताना भरधाव वेगाने जाणारी वाहने अपघाताचे आमंत्रणच देतात का, असाही भास होत असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या. मात्र याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com