बुलडाण्याचे अख्खे उमाळा गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

Containment Zone
Containment Zone

बुलढाणा: सहाशे लोकसंख्या असलेल्या बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील उमाळा Umala या गावात 90 जणांचा कोरोना Corona अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. अजूनही अनेक लोकांचा स्वॅब Swab अहवाल यायचा आहे. Umala village of Buldhana declared as containment zone

कोरोनाने गावाची सर्व घडी विस्कटली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण पॉझिटिव्ह Positive आणि कोण निगेटिव्ह Negative या पलीकडे गावात इतर चर्चांना स्थानच राहिलेले नाही. गावांमध्ये सध्या भयावह स्थिती आहे. 

बुलढाणा तालुक्यातील उमाळा सहाशे Six Hundred लोकसंख्येचे गाव. सध्या या सर्व गावात कोरोना संसर्गाचा कहर माजला आहे. ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधीक रुग्ण सापडणारे बुलढाणा जिल्ह्यातील हे एकमेव गाव ठरले आहे.

या गावात अनेक कुटुंबातील सदस्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती; परंतु कुणाचीही कोरोना तपासणी करण्यात आलेली नव्हती. स्थानिक दवाखान्यात जाऊन उपचार करून रुग्ण घरीच बरे होण्याची वाट पाहत होते. दरम्यान आरोग्य प्रशासनाने Health Administration कोरोना तपासनीस सुरुवात केल्याने  लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह यायला लागले.  त्यानंतर आरोग्य विभागाला या गावाची परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात आले.

"गावातील सर्दीतापाची साथ म्हणजे कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड Community Spread असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  मात्र आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत" असा आरोप माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांनी केला आहे. Umala village of Buldhana declared as containment zone

सध्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच आइसोलेशन सेंटर Isolation Center तयार करण्यात आले आहे. तेथेच रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर गावातील पारावर मंदिर परिसरात कोरोना चाचणी कॅम्प लावला आहे. आता सर्व ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. तसेच बुलढाणा तहसीलदार गावात ठाण मांडून आहेत. सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. उमाळा या गावात कम्युनिटी स्प्रेड झाल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन Containment zone म्हणुन गाव घोषित केले आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com