VIDEO | पंजाबी गायक दिप सिद्धूनं आंदोलन भडकवल्याचा आरोप, पाहा त्याचा हा व्हिडिओ

 VIDEO | पंजाबी गायक दिप सिद्धूनं आंदोलन भडकवल्याचा आरोप, पाहा त्याचा हा व्हिडिओ

पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू याने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलाय. दीप सिद्धूनेच आंदोलकांना लाल किल्ल्यावर नेले. शेतकरी तिथे जाण्याच्या बाजूने कधीच नव्हते असा आरोपही शेतकरी नेत्यांनी केलाय. दीप सिद्धू अनेक दिवसांपासून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत होता. तो भाजपशी संबंधित आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला. दीप सिद्धू हा निवडणुकीत भाजप खासदार सनी देओलच्या प्रचारात सहभागी झाला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचे बरेच फोटो असल्याचं योगेंद्र यादव यांनी सांगितलंय...दीप सिद्धू आंदोलकांना चिथावत होता. याबद्दल  दिल्ली पोलिसांना बर्‍याचदा सांगितलं होतं. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही  असंही योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.

दरम्यान, ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 22 गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी ठिकठिकाणी आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आठ सरकारी बसेस आणि 17 खासगी बसेसची तोडफोड करण्यात आलीय. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात 300 पोलिस जखमी झालेत. दरम्यान, दिल्लीत सध्या निमलष्करी दलाचे आणखी 1500 जवान तैनात करण्यात आलेत.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचे अनेक  व्हिडिओ समोर येतायत. अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. लाल किल्ल्याच्या गेटवर धडकलेल्या शेतकऱ्यांनी तिथल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आणि आंदोलकांच्या संख्येमुळे पोलिस घाबरून पळू लागले. बंद असलेलं किल्ल्याचं गेट समोर लाठ्या-काठ्या घेऊन अंगावर येत असलेले आंदोलक अशा कचाट्यात अडकलेल्या पोलिसांनी अखेर 20 फूट खोल दरीत उड्या घेतल्या. कालच्या दिल्लीतल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे लाल किल्ल्यावर ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी चांगलाच राडा घातला. शिख धर्माचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवण्यात आला. शस्त्रांचं प्रदर्शन करण्यात आलं. घोषणाबाजीही करण्यात आली. या सर्व गोंधळानंतर अखेर काही तासानंतर शेतकरी स्वत:हून या ठिकाणाहून निघून गेले. फक्त लाल किल्ल्यावरच नाही तर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी अशीच काहीशी परिस्थिती होती. काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर कुठे थेट ट्रॅक्टरच पोलिसांवर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घटनांमध्ये गाड्या आणि सार्वजनिक मालमत्तेचं अतोनात नुकसान झालंय. 

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्याचा ताबा घेतला होता. लाल किला परिसरात आंदोलकांनी झेंडाही फडकावला होता. लाल किल्ला परिसरात आंदोलकांनी घातलेल्या धुडगुसीचं चित्र समोर आलंय. आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या आत केलेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय...त्याची दृश्य आज समोर आलीत......आज केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी आज लालकिल्ल्याला भेट दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com