धक्कादायक! देशातील काही भागांमध्ये तिसऱ्या स्टेजला सुरुवात

धक्कादायक! देशातील काही भागांमध्ये तिसऱ्या स्टेजला सुरुवात

देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात सामुहिक संसर्गाला सुरुवात झाली आहे. य़ाचाच अर्थ देशात कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. 

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हा धक्कादायक अहवाल सादर केलाय. या अहवालात असं सूचित करण्यात आलंय. की देशातील काही भागांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचे संक्रमण कम्युनिटी ट्रान्समिशनने तर होत नाही आहे ना, यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने या तपासणीस सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यात असल्याचे सांगितले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 865वर पोहचलीय. गेल्या 24 तासात 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 169 जणांचा मृत्यू झालाय. सध्या 5218 लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेलीय, तामिळनाडू आणि राजधानी दिल्लीतला आकडा 700 पेक्षा अधिक झालाय. तेलंगणा, उत्तर प्रदेशातील रुग्णांची संख्या 400 हून अधिक झालीय. तर कोरोनावरील उपचारानंतर 478 जण ठणठणीत बरे झालेत.

मुंबईत दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. यामध्ये धारावी आणि दादर भागात सातत्यानं रुग्ण वाढताना दिसताहेत. आज धारावीत कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं धारावीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 22 वर जाऊन पोहचलीय. तर दादर परिसरात आणखी तिघांची भर पडलीय. इथं सुश्रूषा रुग्णालयातल्या २ नर्सना कोरोना झालाय. त्यामुळं दादर परिसरातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ६ वर जाऊन पोहचलाय.

Web Title - marathi news The third stage started in some parts of the country

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com