'त्या' व्हायरल मेसेजमुळे कोल्पूरकर चिंतेत, कोल्हापुरात खरंच घडलाय अपशकून?

'त्या' व्हायरल मेसेजमुळे कोल्पूरकर चिंतेत, कोल्हापुरात खरंच घडलाय अपशकून?

कोरोनाच्या संकटाशी अवघं जग झुंजतंय. हा लढा कोल्हापूरकरही देताहेत. मात्र, सध्या त्यांची झोप उडालीय वेगळ्याच चर्चेनं.
ही चर्चा आहे कोल्हापूरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईबाबतची. कोल्हापुरात सध्या सोशल मीडियातून मेसेज व्हायरल होतोय. हा मेसेज आहे अंबाबाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटल्याचा.
हिंदू संस्कृतीत मंगळसूत्राला मोठं महत्त्व आहे. मंगळसूत्र तुटण्याचा संबंध शकुन-अपशकुनाशी जोडतात. त्यामुळे महिलांनी गळ्यात हळकुंड बांधावं, असंही या मेसेजमध्ये म्हटलंय.
सोशल मीडियातून हा मेसेज फिरू लागल्यानंतर कोल्हापूरकरांची झोप उडालीय. महिलाही प्रचंड चिंतेत आहेत..त्या पार्श्वभूमीवर आम्ही या मेसेजचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांशी संपर्क साधला. नंतर पोलिसांशीही संपर्क साधला. चक्क त्यांनी सुद्धा या अफवेला दुजोरा दिलाय. आणि हा मेसेज खरा असल्याचं म्हटलं

देश संकटात असताना, अशा प्रकारच्या अफवा पसरवणारे समाजकंटकच आहेत. त्यामुळे अशा मेसेजेसकडे लक्ष देऊ नका..कुणी अफवा पसरवत असेल तर त्याला समज द्या. अंबाबाईचं मंगळसूत्र तुटलं ही चर्चा आमच्या पडताळणीत असत्य ठरलीय.

Web Title - marathi news kolhapur ambabai viral massage reality check

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com