VIDEO | उजनी धरणात पाणी नव्हे हिरवं विष

VIDEO | उजनी धरणात पाणी नव्हे हिरवं विष

उजनी धरणात पाणी नव्हे तर विष आहे, असं मत या धरणाच्या क्षेत्रातले लोक व्यक्त करतायत...का आलीय त्यांच्यावर पाण्याला विष म्हणण्याची वेळ,उजनी धरणातलं हे पाणी बघा...हा रंग पाहून तुम्ही त्याला पाणी म्हणण्याचं धाडस करू शकणार नाही...हे हिरवं पाणी  परिसरातल्या नागरिकांसाठी आणि जनावरांसाठी जणू विष ठरतंय..
सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांसाठी उजनी धरण वरदायिनी मानलं जातं..मात्र, धरणातल्या पाण्याला प्रदूषणाचा विळखा पडलाय..इंदापूर तालुक्यातल्या डिकसळ इथल्या पुलापासूनच या पाण्याचा रंग हिरवा झालाय..पाण्याचा केवळ रंगच बदललाय असं नाही तर पाण्याला असह्य अशी दुर्गंधी येतेय..इतकंच नाही तर या लाटा किनाऱ्यावर आल्यावर तिथं पांढरा फेस होतोय..
GFX IN या पाण्याचा शरीराशी संपर्क झाल्यास अंगाला खाज सुटते..पुरळ येते..हे पाणी प्यायल्यानं जनावरं रोगट होतायत..त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोय

पुणे जिल्हा आणि जवळपासच्या परिसरातून मलमूत्र, सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधलं रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उजनी जलाशयात सोडलं जातं..आणि गंभीर बाब म्हणजे कोणत्याही प्रक्रियेशिवाय पिण्यासाठी थेट वापरलं जातं..उजनीच्या पाण्यावर संशोधन झालंय..त्यातही हे  पाणी पिण्यायोग्य नसल्याचं ठामपणे सांगितलंय..तरीही हे विषासमान पाणी नागरिकांना नाईलाजानं प्यावं लागतंय..त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडायची वाट प्रशासन पाहतंय का, असा सवाल  आता इथले नागरिक विचारत आहेत

WebTittle :: Green poison, not water in Ujani dam


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com