VIDEO | चिकनमध्ये कोरोना व्हायरस? चिनी शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

VIDEO | चिकनमध्ये कोरोना व्हायरस? चिनी शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

चिकन प्रेमींची चिंता वाढवणारी एक बातमी चिनमधून समोर आलेय. चिनमध्ये फ्रोझन चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडलाय. ज्यामुळे जगभरातले चिकनप्रेमी आता चिंतेत सापडलेत. बघुयात चीनमध्ये नेमकं काय घडलंय.

चीनने केलेल्या या नव्या आवाहनामुळे चिकनप्रेमी चक्रावलेत. त्याचं झालंय असं, की चीनच्या शेनझेन मधील एका लॅबमध्ये ब्राझीलमधून आलेल्या फ्रोझन चिकनची कोरोना टेस्ट करण्यात आली. आणि या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर स्थानिक सीडीसीने पॅकेज फूड न खाण्याचं आवाहन केलं. मात्र या घटनेमुळे जगभरात चर्चा सुरु झाली, की कोरोनाच्या या संकटात पॅकेज फूड खाणं किती सुरक्षित आहे.

जगभरात चीनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर प्रतिक्रिया येतायत...

 फ्रोझन चिकनमध्ये कोरोना? 

  • WHO ने चीनचा हा दावा फेटाळलाय.
  • फ्रोजन चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे पुरावे नसल्याचं WHO ने म्हटलंय... 
  • तसंच चीनमध्ये हजारो पॅकेज फूडमधून केवळ १० पॅकेज फूड्समध्येच हा विषाणू आढळल्याचं म्हटलंय. 
  • या पॅकेज फूडच्या संपर्कात आलेल्यांचा टेस्ट करण्यात आल्या. त्याही निगेटिव्ह आल्या आहेत. 
  • जिथून या चिकनचा सप्लाय झाला त्या ब्राझिलनेही चीनच्या दाव्यावर शंका घेतलेय... 
  • चीनने अद्याप याचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत  

कोरोना व्हायरस पसरला. तेव्हापासूनच चीन सातत्याने खोटं बोलून जगाची दिशाभूल करतोय. त्यामुळे जगासमोरच्या अडचणी अधिकाधिक वाढत गेल्यात. अशात चीनने चिकनबाबत केलेल्या या नव्या दाव्यावर विश्वास कसा ठेवायचा. हा ही प्रश्न बाकी उरतोच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com