दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पुन्हा शुकशुकाट !

delhi maharashtra sadan
delhi maharashtra sadan

नवी दिल्ली : नेहमी लखलखणारी हंड्या झुंबरं पुन्हा एकाकी झाली आहेत. दर्शनी भागात लावलेल्या भव्य समस्यांची झळाळी उदास भासते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह Shivaji Maharaj फुले-शाहू-आंबेडकर, सावित्रीबाई फुले Savitribai Phule, अहिल्यादेवी होळकर ahilyabai holkar, यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan आदींचे देखणे पुतळे जणू पुन्हा मौनात गेले आहेत. येणाऱ्या जाणार्यांची अत्यल्प वर्दळ जाणवते आहे.राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील navi delhi महाराष्ट्राची Maharashtra शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन महाराष्ट्र सदनातील हे चित्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या दिसून येत आहे. Delhi's Maharashtra Sadan again silent due to corona

दिल्लीत लॉकडाऊनला lockdown सुरुवात झाली आहे. मात्र रुग्णसंख्येचा वाढता आकडा आणि सार्‍या देशातच उडालेला कोरोना कहर यांचा परिणाम महाराष्ट्र सदनात येणाऱ्या पाहुण्यांवर झाला आहे. एरव्ही दिल्लीत महाराष्ट्र सदनात येणाऱ्यांमध्ये राज्यातील मंत्री, आमदार, राजकारणी, पत्रकार, सरकारी अधिकारी यांची वर्षभर वर्दळ असते. दिल्लीत महाराष्ट्र सदन आणि त्याच्या भव्यतेचा प्रभाव देशातील भल्याभल्या नेत्यांवर पडला आहे .सदनाचा, त्याच्या भव्यतेचा लौकिक ऐकून येथे फक्त जेवणासाठी येणाऱ्यांची संख्याही एरव्ही  लक्षणीय असते.

मात्र गेल्या दहा दिवसांपासून या संख्येत घट होत होत आता एक विचित्र शुकशुकाट जाणवत आहे. राज्यातून या ना त्या कामानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांची संख्याकमी होत ती रोज 50 ते 60 वरून सध्या दोन ते तीनवर आली आहे. बाहेर कडक लॉकडाऊन असल्याने येणाऱ्या पाहुण्यांना भेटल्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. दोन्ही महाराष्ट्र सदनांमधील उपहारगृहे आठवडाभरापासून बंद आहेत. ज्यांना मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी पार्सलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि तशी नोटीस दोन्ही सदनांच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आली आहे. Delhi's Maharashtra Sadan again silent due to corona

महाराष्ट्रातून सदनात येणाऱ्या अभ्यंगत्यांची संख्या कोरोनाच्या नव्या तडाख्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. नेहमी राहणारे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याशिवाय इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सदनात येणाऱ्या व राहणाऱ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. स्वागतकक्षात हात साबणाने स्वच्छ धुवून सॅनिटाइझ करूनच प्रवेश दिले जात आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने
शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात असल्याचा दावा सदनाच्या प्रशासनाने केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com