Special Olympics-Summer Games: विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ बर्लिनला रवाना

Anurag Singh Thakur: भारतीय संघ विशेष ऑलिम्पिक - उन्हाळी क्रीडा स्पर्धेसाठी बर्लिनला रवाना झाला आहे.
Special Olympics-Summer Games:
Special Olympics-Summer Games:twitter

Olympics-Summer Games: भारतीय संघ विशेष ऑलिम्पिक - उन्हाळी क्रीडा स्पर्धेसाठी बर्लिनला रवाना झाला आहे. ज्यात १९८ खेळाडूंसह २८० सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी रवाना होण्यापुर्वी ८ जुन रोजी निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभात खेळाडूंना, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना भेटण्याची संधी मिळाली.

Special Olympics-Summer Games:
R Ashwin On WTC Final: अखेर मौन सोडलं... WTC च्या अंतिम सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल अश्विनने केलं मोठं विधान

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी विशेष ऑलिम्पिकमधील भारतीय चमूच्या सहभागासाठी ७.७ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. ही आजपर्यंतची स्पर्धेसाठी मंजूर केलेली सर्वाधिक रक्कम आहे. (Latest sports updates)

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे या जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी संघाचे पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरही पार पडले. या जागतिक स्पर्धेत १९० देशांमधून ७००० हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

या स्पर्धेचे आयोजन १७ ते २५ जून दरम्यान करण्यात येणार आहे. या भव्य स्पर्धेत १६ विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू पदकांसाठी लढताना पहायला मिळणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com