Rohit Sharma Wicket: रोहीत Not Out होता! Sanju Samson ने उडवली बेल्स? विकेटचा स्लो मोशन व्हिडिओ आला समोर- VIDEO

Rohit Sharma Wicket Video: या सामन्यात रोहित शर्माचा विकेट चर्चेचा विषय ठरला.
rohit sharma wicket
rohit sharma wicketsaam tv

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना खास ठरण्याची अनेक कारणं होती. मुख्य कारण म्हणजे हा आयपीएल स्पर्धेतील १००० वा सामना होता.

तर दुसरं मुख्य कारण म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा ३६ वा वाढदिवस होता. या सामन्यात अंतिम षटकात टीम डेव्हिडने सलग ३ षटकार मारून मुंबई इंडियन्स संघाला जोरदार विजय मिळवून दिला आणि कर्णधाराला स्पेशल गिफ्ट दिलं.

दरम्यान या सामन्यात रोहित शर्माचा विकेट चर्चेचा विषय ठरला.

rohit sharma wicket
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

या डावात फलंदाजीला आलेला रोहित शर्मा संदीप शर्माच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला होता. मात्र रोहितची विकेट पडताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. रोहित क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. (Rohit Sharma Wicket Video)

मात्र सोशल मीडियावर अनेकांचं म्हणणं आहे की, रोहित शर्मा आउट नव्हता. रोहितच्या विकेटचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ज्यात तुम्ही पाहू शकता की, संदीप शर्माचा चेंडू बेल्सला स्पर्श देखील झाला नाहीये.

तर ती बेल्स संजू सॅमसनच्या बेल्समुळे पडली असल्याचे दिसून येत आहे. मात्र अंपायरने त्याला बाद घोषित केलं. (Latest sports updates)

अनलकी रोहित शर्मा

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २१३ धावांचा डोंगर सर करायचा होता. बड्डे बॉय रोहित शर्माकडून मोठया खेळीची अपेक्षा होती. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला एकही मोठी खेळी करता आली नाहीये. त्याने या डावात ५ चेंडूंचा सामना करत ३ धावांची खेळी केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर रोहित शर्मा अनलकी ठरल्याचे दिसून येत आहे. मात्र अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय ठरला.

मुंबईचा जोरदार विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी २१३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला अंतिम षटकात १७ धावांची गरज होती. अंतिम षटकात १७ धावांचा पाठलाग करताना फलंदाज दबावात असतो. मात्र यावेळी गोलंदाजी करत असलेला जेसन होल्डर दबावात असल्याचे दिसून आले. अंतिम षटक सुरू होण्यापूर्वी असे वाटत होते की, राजस्थान रॉयल्स हा संघ जिंकणार. मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर टीम डेविडने षटकारांची हॅट्रिक केली आणि आपल्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com