पालघरच्या रूद्राक्ष पाटीलने रचला इतिहास, सुवर्ण पदक जिंकून केला विश्वविक्रम

पालघर जिल्ह्यातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
Rudraksh Patil won Gold Medal
Rudraksh Patil won Gold Medalsaam Tv

पालघर : जिल्ह्यातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचा मुलगा रुद्राक्षने पाटीलने (Rudraksh Patil) चमकदार कामगिरी केलीय. दहा मीटर रायफल स्पर्धेत रुद्राक्षने विश्वविक्रम केला आहे. टोकीयो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विजय पटकावलेल्या तिनही स्पर्धकांवर मात करत रूद्राक्षने सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. त्यामुळे 2024 मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रुद्राक्षचा कोटा निश्चित झाला आहे. (Rudraksh Patil won gold medal in Rifle Shooting)

Rudraksh Patil won Gold Medal
T20 World Cup : भारत-पाकिस्तानमध्ये होणार रंगतदार लढत, मोहम्मद शमी खेळणार का? रोहित शर्मा म्हणाला...

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत रुद्राक्षने वेगळं स्थान निर्माण केलं आहे . रुद्राक्षने राष्ट्रीय स्पर्धेत 20 सुवर्ण,12रोप्य ,7 रजत पदक मिळवत खेलो इंडिया युथ स्पर्धा 2020 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं .आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रुद्राक्षने 8सुवर्ण ,3रोप्य पदकांवर नाव कोरलं होतं .

Rudraksh Patil won Gold Medal
भारत आशिया कप 2022 जिंकला! स्मृती मानधनाची आक्रमक फिफ्टी, षटकार ठोकून श्रीलंकेचा केला पराभव

रुद्राक्ष सध्या सिनिअर वर्ल्ड रँकिंग मध्ये सातव्या क्रमांकावर असून ज्युनिअर वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.रुद्राक्षची कामगिरी पाहता आगामी ऑलम्पिक स्पर्धेत रुद्राक्ष देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात कमी पडणार नाही, असा विश्वास रुद्राक्षच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com