Jaydev Unadkat Ruled Out: टीम इंडियाला दुहेरी धक्का! संघातील २ दिग्गज खेळाडू WTC फायनलमधून बाहेर?

Jaydev Unadkat: भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे
TEAM INDIA
TEAM INDIAsaam tv

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण चेन्नई सुपर किंग्ज संघाला गेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर लखनऊ सुपर जायंट्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

TEAM INDIA
Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

लखनऊ सुपर जायंट्स संघातील वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. रविवारी नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरु असताना तो अचानक पडला. ज्यामुळे सर्व वजन त्याच्या उजव्या खांद्यावर पडले. या घटनेचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. जयदेव उनाकडट वेदनेने कळवळताना दिसून आला होता. तर फिजिओ बर्फ लावताना दिसून आला होता.

राहिला प्रश्न वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअयनशिपच्या अंतिम सामन्याचा, तर मिळालेल्या माहितीनुसार तो या सामन्यापर्यंत पूर्णपणे फिट होईल. हा सामना येत्या ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. तसेच अशी देखील माहिती समोर येत आहे की, तो स्कॅनसाठी मुंबईला देखील गेला होता. (Latest sports updates)

TEAM INDIA
Virat Kohli vs Gautam Gambhir : मैदानातच जोरदार राडा, विराट कोहली-नवीन भिडले; नतंर गंभीर सोबत झाला राडा - VIDEO

केएल राहुल आज खेळणार का?

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. क्षेत्रक्षण करत असताना तो पडला होता. त्यानंतर काही मिनिटे तो उठूच शकला नव्हता. शेवटी फिजिओ आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी त्याला सहारा देत मैदानाबाहेर नेलं होतं. या सामन्यात तो सलामीला फलंदाजीला न येता ११ व्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी खेळण्यासाठी आला होता. आज होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com