IPL 2022: आता प्लेऑफसाठी संघर्ष; हैद्राबाद लगावणार विजयाचा 'षटकार'?

IPL च्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 40 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात होणार आहे.
SRH vs GT- IPL 2022
SRH vs GT- IPL 2022 Saam TV

IPL च्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 40 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात होणार आहे. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पॉइंट टेबलमध्ये (IPL 2022 Point Table) पहिले स्थान मिळवण्यासाठी हैदराबादचा संघ कसून सराव करत आहे. त्याचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

SRH ने 'आमच्या दृष्टीक्षेपात सलग 6 वा विजय असून IPL च्या पॉईंट टेबलमध्ये शिखरावर पोहोचायचं आहे' अशा कॅप्शनसह व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरती टाकला आहे. सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी सरावात घाम गाळताना दिसले.

SRH ने सलग पाच सामने जिंकले आहेत. त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 9 गडी राखून पराभव केला आहे. सनरायझर्सला आयपीएल 2022 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्याकडून सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला होता, परंतु तेव्हापासून संघाने मागे वळून पाहिले नाही. त्यांनी सलग पाच सामने जिंकले आहेत. जर सनरायझर्स हैदराबादला गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकता आला तर ते पॉईंट टेबलरच्या अव्वल स्थानावर पोहोचू शकतात.

या सामन्यातील एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की हा सामना पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये होणार आहे. म्हणजेच, जेथे SRH 5 विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स 7 विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

गुजरात टायटन्स

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन.

सनरायझर्स हैदराबाद

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ/वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com