IND vs AUS कसोटी मालिकेची पार हवाच गेली; वॉर्नर-कमिन्ससह 8 खेळाडू मायदेशी परतले, आता सामना होणार की नाही?

कॅप्टन पॅट कमिन्स कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने परतला आहे.
Ind vs Aus
Ind vs Aus Saam Tv

IND vs AUS Test Series : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दोन सामन्यात भारताने दणदणीत विजय साजरा केला आहे. उरलेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर झाला आहे. या दोन सामन्यांआधी डेविड वॉर्नर आणि पॅट कमिंन्ससह आठ खेळाडू मायदेशी परतले आहेत.

कॅप्टन पॅट कमिन्स कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने परतला आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या फिटनेस रिपोर्टनंतर संघ त्यांच्या फिट होण्याची वाट पाहत होता मात्र टीम मॅनेजमेंटने त्याला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Sports Updates)

Ind vs Aus
IAS-IPS Officer Dispute: कर्नाटकात भिडल्या दोन IAS-IPS अधिकारी; प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्याने खळबळ

दौऱ्यात अद्याप एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या अॅश्टन आगरनेही मालिकेतून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून तो शेफिल्ड शिल्डविरुद्ध खेळू शकेल. ऑफस्पिनर टॉड मर्फीला साइड स्ट्रेनमुळे ऑस्ट्रेलियाला जावे लागले आहे. तर लेगस्पिनर मिचेल स्वेप्सन आधीच मायदेशी परतला आहे. मिचेल स्टार्क, लान्स मॉरिस आणि कॅमेरून ग्रीन पूर्णपणे फिट असतानाही देशात परतले आहेत.

Ind vs Aus
Dog Attack On Boy : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतल्यानंतर, इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो पुनरागमन करू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजमेंट स्टीव्ह स्मिथकडे शेवटच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. तर डेव्हिड वॉर्नरच्या बाहेर पडल्यानंतर उस्मान ख्वाजासह ट्रॅव्हिस हेड सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात.

ऑस्ट्रेलियन संघ

उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नेमन आणि स्कॉट बोलँड.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com