Ind vs aus 3rd odi live updates: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम वनडे सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६९ धावांवर संपुष्ठात आला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७० धावांची गरज आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार पुनरागमन करत १० गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे हा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाकडून फलंदाजी करताना मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरीने ३८ धावांचे योगदान दिले. इतर तर ट्रेवीस हेडने ३३ धावांचे योगदान दिले.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अक्षर पटेलने २ गडी बाद केले.
भारतीय संघाची प्लेइंग-११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.