पृथ्वी शॉ ने अवघ्या 22 व्या वर्षी खरेदी केले घर; किंमत ऐकून थक्क व्हाल

पृथ्वी शॉ चे हे घर इमारतीच्या (Prithvi Shaw New Home) आठव्या मजल्यावर आहे.
Prithvi Shaw
Prithvi ShawSaam TV

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनमध्ये १०.५ कोटी रुपयांना घर खरेदी केले आहे. या घराचा कारपेट एरिया 2,209 स्वेअर फुट आहे. त्याचबरोबर 1,654 स्वेअर फुटचा टेरेस आहे. पृथ्वी शॉ चे हे घर इमारतीच्या (Prithvi Shaw New Home) आठव्या मजल्यावर आहे. या घरासोबत पृथ्वी शॉ ला विशेष सुविधा मिळाली आहे. त्याला त्याच्या तीन कार पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे.

indextap.com द्वारे जारी केलेल्या दस्तऐवजांवरून असे दिसून येते की पृथ्वी शॉ ने 31 मार्च रोजी केलेल्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क म्हणून 52.50 लाख रुपये भरले आहेत आणि 28 एप्रिल रोजी नोंदणी केली होती. 22 वर्षीय क्रिकेटपटूने हे अपार्टमेंट पिरॅमिड डेव्हलपर्स आणि अल्ट्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स यांच्याकडून विकत घेतले आहे.

Prithvi Shaw
IPL 2022 : सहा पराभवानंतरही चेन्नई प्ले-ऑफमध्ये पोहचणार? पाहा समीकरण

पृथ्वी शॉची क्रिकेट कारकिर्द

* फेब्रुवारी 2018 मध्ये, शॉ ने भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. भारताला विश्वचषक जिंकून देण्यासाठी पृथ्वीने मोलाचा वाटा उचलला होता.

* त्याच वर्षी, इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावात त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1.2 कोटी रुपयांना विकत घेतले.

* तो सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो.

* शॉच्या अपार्टमेंटचा व्यवहार महाराष्ट्र सरकारने रेडी रेकनर आणि मुद्रांक शुल्क दर वाढवण्यापूर्वी झाला होता.

* 1 एप्रिलपासून लागू होऊन, राज्य सरकारने महाराष्ट्रातील मालमत्तांच्या रेडी रेकनर दरांमध्ये सरासरी 5 टक्के वाढ जाहीर केली होती.

सुधारित रेडी रेकनर दरांनुसार, ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक वाढ सरासरी 9.48 टक्के असणार आहे, तर बृहन्मुंबईमध्ये दर 2.34 टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय सरकारने मुंबईत मुद्रांक शुल्कावर 1 टक्के मेट्रो उपकर देखील लागू केला आहे. ज्यामुळे शहरातील मालमत्ता संपादनाची किंमत वाढली आहे. राज्य सरकारने मर्यादित-विंडो मुद्रांक शुल्कात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर, देशातील सर्वात मोठी आणि सर्वात महाग रिअल इस्टेट बाजारपेठ असलेल्या मुंबईने अलीकडेच मालमत्तेच्या व्यवहारांसह नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com