PBKS vs MI,IPL 2024: भर मैदानात हार्दिकचा अपमान? रोहित समोर येताच संघातील खेळाडूनं केलं इग्नोर- Video

Hardik Pandya Ignored: मुंबई इंडियन्य संघाने या सामन्यात शानदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यातील शेवटच्या षटकातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
akash madhwal ignored hardik pandya during pbks vs mi ipl match watch video amd2000
akash madhwal ignored hardik pandya during pbks vs mi ipl match watch video amd2000twitter

पंजाब किंग्ज संघविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला आहे. हा सामना मुबंई इंडियन्स संघाने ९ धावांनी जिंकला आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की, मुंबई इंडियन्स या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार. मात्र आशुतोष शर्माने मुंबईच्या अडचणी वाढवल्या. मात्र शेवटी तो बाद झाला आणि मुंबईने हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भर मैदानात नेमकं काय झालं?

शेवटच्या काही षटकांमध्ये सामन्याचा रोमांक आणखी वाढला. कारण पंजाबला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी केवळ १२ धावांची गरज होती. त्यावेळी आकाश मधवाल गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा आणि आकाश मधवाल एकत्र असल्याचं दिसून आलं.

akash madhwal ignored hardik pandya during pbks vs mi ipl match watch video amd2000
Hardik Pandya Statement: 'IPL मध्ये हे होतच..' पंजाबला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

नेमकं काय घडलं?

ही घटना सामन्यातील शेवटच्या षटकात घडली. हा सामना पंजाब किंग्ज संघाला ६ चेंडू १२ धावा करायच्या होत्या. त्यावेळी पंजाबची धावसंख्या ९ गडी बाद १८१ इतकी होती. कगिसो रबाडा आणि हर्षल पटेल खेळपट्टीवर होते. मुंबई इंडियन्स संघाकडून आकाश मधवाल गोलंदाजीसाठी करण्यासाठी आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,हार्दिक पंड्या आकाश मधवालला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मात्र नेमकं त्याचवेळी रोहित येतो. आकाश रोहितचं बोलणं ऐकतो आणि हार्दिक पंड्याकडे दुर्लक्ष करतो.

मुंबई इंडियन्स संघाचा शानदार विजय...

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटकअखेर १९२ धावा केल्या. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून आशुतोष शर्माने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. हा सामना मुंबई इंडियन्सने ९ धावांनी जिंकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com