IPL 2022 : फायनलमध्ये होणार धमाल; रणवीर सिंह, ए.आर. रेहमान स्टेडीयम मध्ये पोहोचले, पाहा व्हिडिओ

IPL 2022 : फायनलमध्ये होणार धमाल; रणवीर सिंह, ए.आर. रेहमान स्टेडीयम मध्ये पोहोचले, पाहा व्हिडिओ

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा अंतिम सामना आज होणार आहे.

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वाची (IPL 2022) सांगता आज सायंकाळी ८ वाजता होणार असून या क्लोजिंग सेरेमनीत बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स नृत्य सादर करणार आहेत. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) मध्ये यंदाच्या मोसमाचा अंतिम सामना होणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये हा रंगतदार सामना होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, फायनल सुरु होण्याआधी क्लोजिंग सेरेमनीची (Closing Ceremony) धमाल होणार आहे. ६५ मिनिटं बॉलिवूड स्टार्स त्यांच्या जलवा स्टेजवर सादर करणार आहे.

ए.आ.र रेहमान आणि नीती मोहन स्टेडियममध्ये पोहोचल्या

आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीत ऑस्कर अवॉर्ड विजेते संगीतकार ए.आर. रेहमान ( A R Rahman), बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranvir singh) आणि गायिका नीती सिंग मोहन नृत्य सादर करणार आहेत. ए.आर.रेहमान आणि नीती मोहन स्टेडीयम मध्ये पोहोचल्या असून त्यांनी सरावही सुरु केला आहे. नीती मोहनने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.

रणवीर सिंहने अशी केली तयारी

रणवीर सिंहनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. हाच व्हिडिओ आयपीएलने रीट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह सराव करताना दिसत आहे. तसंच फायनल सुरु झाल्यानंतर पहिल्या इनिंग्सच्या दुसऱ्या स्ट्रॅटजिक टाइमआऊटला लाल सिंग चड्डा सिनेमांचं ट्रेलरही प्रदर्शीत करण्यात येणार आहे.

झारखंडचेही सहा कलाकार नृत्यू सादर करणार

बॉलिवूड स्टार्सच्या व्यतिरिक्त क्लोजिंग सेरेमनी मध्ये झारखंडचे सहा कलाकार नृत्य सादर करणार आहेत. प्रभात कुमार महतो यांच्या नेतृत्वातील १० सदस्यांची टीम २४ मे रोजीच गुजरातला रवाना झाली होती. या टीमने भूटान, संयुक्त अरब अमिराती आणि चीनसारख्या देशांमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन केलं होतं.

IPL 2022 : फायनलमध्ये होणार धमाल; रणवीर सिंह, ए.आर. रेहमान स्टेडीयम मध्ये पोहोचले, पाहा व्हिडिओ
IPL Final 2022 : आयपीएल फायनल कोण जिंकणार? 'हे' ५ खेळाडू ठरवणार

२०१८ नंतर पहिल्यांदाच क्लोजिंग सेरेमनी

आयपीएलमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदाच क्लोजिंग सेरेमनी होणार आहे. २०१९ ला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला होता, त्यामुळे तेव्हा क्लोजिंग सेरेमनी झाली नव्हती. तसेच २०२० आणि २१ मध्ये कोरोना महामारीमुळं क्लोजिंग सेरेमनी करण्यात आली नव्हती. दरम्यान, भारत देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याने टीम इंडियाच्या आतापर्यंतचा प्रवासही या सेरेमनी मध्ये प्रदर्शीत केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com