लाईट नसेल तरीही लाईट, पंखा, टीव्ही, वॉशिंग मशीन सगळं काही सुरु राहू शकते

लाईट नसेल तरीही लाईट, पंखा, टीव्ही, वॉशिंग मशीन सगळं काही सुरु राहू शकते

लाईट, पंखा, टीव्ही, वॉशिंग मशीन सगळं काही लाईट नसेल तरी चालू शकतं. लाईट नसली तरी या घरात मात्र, दिवसरात्र उजेड तुम्हाला पाहायला मिळेल. या घरातील प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तू सौरउर्जेवर चालतेय.

हिटरपासून ते इस्त्रीपर्यंत आणि फ्रिजपासून ते वॉशिंगमशीन पर्यंत सगळं सौरउर्जेवर चालतं. हे शक्य करून दाखवलंय पुण्यातील मोहन पाटील या अवलियानं. यासाठी त्यांनी 100 व्हॅटचे 3 सौर पॅनल बसवलेयत. विशेष म्हणजे वातावरणाशी अनुकूल असणारे पॅनल बसवण्यात आलेयत. म्हणजे सूर्याचा प्रकाश नसतानाही किमान 60 ते 70 टक्के चार्ज होऊ शकेल.

त्याचप्रमाणे 2 बॅटरी आणि 1 सोलर चार्ज कंट्रोलर बसवलेयत. ज्याद्वारे घरातील प्रत्येक विजेवर चालणारे उपकरण सौरऊर्जेवर परावर्तित केलेयत. त्यामुळं महावितरणाचं बिल  अत्यंत माफक येतंय.

ऐन गडबडीच्या वेळी लाईट गेल्यास घरातील गृहिणींची अनेक कामं खोळंबतात. वॉशिंग मशिनपासून ते मिक्सरपर्यंतची सर्व कामे आज विजेवर अवलंबून आहेत .मात्र, पाटील कुटुंबियांच्या घरात विजेवाचून खोळंबून बसण्याची वेळच येत नाही. इतरांकडे लाईट नसली तरी मात्र, पाटील कुटुंबियांचं घर लाईटनं उजळलेलं दिसतं.

2013 पासून सौरऊर्जेवरील अभिनव प्रयोगाला मोहन पाटलांनी सुरूवात केली. एकेक करत अतिशय कमी खर्चात घरातील सगळी उपकरणं सौरऊर्जेवर चालू केली. त्यामुळं लाईट नसली तरी आज मोहन पाटलांचं काम लाईटविना थांबत नाही. त्यामुळं अशा प्रकारे तुम्हीदेखील सौरऊर्जेचा वापर केलात तर भविष्यात विजेची समस्या भेडसावणार नाही.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com