शिवसेना-भाजपमध्ये दुरावा का आला? आज संजय राऊत उलगडणार गुपित?

 शिवसेना-भाजपमध्ये दुरावा का आला? आज संजय राऊत उलगडणार गुपित?

नाशिक : शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा तीस वर्षे चाललेला राजकीय संसार यंदा मोडला?. दोघांची युती मोडण्याला कोण कारणीभूत होते?. अन्‌ यातून महाविकास आघाडीचे अशक्‍य सरकार शक्‍य कसे झाले याविषयी प्रत्येक मराठी माणसाला अन्‌ देशातील प्रत्येकाला उत्सुकता आहे. मात्र हे अद्याप कोणीच्याच ओठावर आले नाही. यातील महत्वाचा घटक, बिनधास्त विधाने करणारे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये सांगणार का? याचे उत्तर आज सायंकाळी मिळणार आहे.

शिवसेना नगरसवेक अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे आज सायंकाळी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात शवसेना नेते खासदार राऊत यांच्या मुलाखतीचा प्रकट कार्यक्रम होणार आहे. राजू परुळेकर ही मुलाखत गेणार आहेत. त्याचे स्वरुप अगदीच क्राईम रिपोर्टर ते शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक, शिवसेना नेते, राज्यसभा सदस्य हा सगळा प्रवास ते उलगडणार आहेत. 

अलिकडच्या काळात श्रीरामजन्मोत्सव, अयोध्या दौरा अन्‌ विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार यावर ठाम भूमिका घेत सातत्याने विधाने करुन ते चर्चेत राहिले होते. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राऊत यांच्या भूमिकेमुळे सातत्याने संताप व्यक्त कीरत तयांना टिकेचे लक्ष्य केले होते. यादृष्टीने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचा समावेष असलेले महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. याची नेमीक मिमांसा व त्यातील गुपिते खासदार संजय राऊत आपल्या मुक्त चिंतनात सांगण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने या मुलाखतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com