दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनानं झालीये. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केलीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल होताच विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधीमंडळात आल्यानंतर भाजप आमदारांकडून पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वैदकीय प्रवेश 70-30 चा फॉर्म्युला रद्द करत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पाहा विधानसभेतून थेट लाईव्ह, विरोधकांची घोषणाबाजी -
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.