पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आणू नका - मुख्यमंत्री

पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आणू नका - मुख्यमंत्री

1 जुलैपासून लॉकडाऊन उठणार नसून हळूहळू काही सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलाय. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळं सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. तरीही ज्या ठिकाणी परिस्थिती बिघडेल, तिथं पुन्हा ल़ॉकडाऊन लावावं लागेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

कोरोनाला हरवण्यासोबत अर्थचक्राला गती देणंही गरजेचं आहे, त्यासाठी उद्योग पुन्हा सुरु होताहेत..परकीय गुंतवणूकही केली जातेय, त्यामुळं येत्या काळात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय यंदा महाराष्ट्रातर्फे पंढरपूरला जाऊन विठुरायाला साकडं घालणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय या लॉकडाऊनच्याही काळात जे शेतकऱ्यांची फसवणूक करतात, बियाणं, खतांचा काळाबाजार करतात त्यांची खैर नाही असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

यासह, साम टीव्हीच्या मागणीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतलीय. कोरोनातून बऱ्या झालेल्या नागरिकांना आपल्या रक्तातील प्लाझ्मा डोनेट करावा असं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. याबाबत साम टीव्हीनं बातमी दाखवली होती. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे डॉक्टर जलील पारकर यांनी याबाबतची मागणी लावून धरली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही प्लाझ्मा डोनरची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं. यासाठी प्लाझ्मा डोनर सेंटरही उभे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com