राम मंदिर निर्माणासाठी शिवसेना सुरुवातीपासूनच आक्रमक राहिली. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी अनेकदा अयोध्या वारी केली. पण आता राम मंदिरांचं भूमिपूजन होत असताना शिवेसना संभ्रमात आहे. तर दुसरीकडे भाजप दिवाळी साजरी करतंय.
अनेक वर्ष ज्या दिवसाची प्रतीक्षा होती. तो दिवस अखेर जवळ आलाय. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भूमिपूजन होतंय. आणि हा ऐतिहासिक दिवस भाजपने दिवाळ सणासारखाच साजरा करण्याचं ठरवलंय. मात्र या सगळ्यात भाजपचा कधीकाळचा मित्रपक्ष शिवसेना संभ्रमात आहे.
भाजप दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत असताना हा सोहळा नेमका कसा साजरा करावा? हे शिवसेनेचं काही ठरलेलं नाही.
भाजपने राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा हायजॅक केल्यानंतर अर्थातच शिवसेनेची राजकीय कोंडी होतेय. आणि विरोधकही तोंडसुख घेतायत. या सगळ्या डिवचण्याच्या खेळात भाजप मात्र दिवाळीच्या तयारीला लागलेय.
हेही वाचा -
राज्यभर भाजपची दिवाळी
देश राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा अनुभवत असताना, राज्यात भाजप शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न करतेय... भाजपने दिवाळीची तयारी केलेय.. आता शिवसेना या दिवाळीत फटाके फोडणार? की चिडीचूप राहणं पसंत करणार? हे तेव्हाच कळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.