मोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद....

 मोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद....

मुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा बदला घेणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर नुकताच ‘उरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटातील ‘हाऊ इज दि जोश’ हा संवाद मोदी यांनी बोलून दाखविला अन्‌ बॉलीवूडकरांनी तुफान टाळ्यांच्या गजरात या संवादाला दाद दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणारे हे संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. या वेळी मोदी म्हणाले की, ‘सरकार पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या ‘पायरसी’च्या समस्येला आळा घालण्यासाठी १९५२च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पायरसी हा चित्रपटसृष्टीतल्या कलावंताच्या कष्टाची चोरी आहे. चित्रपटसृष्टीच्या या कष्टाची चोरी होणार नाही यासाठी ‘पायरसी’विरोधात सरकार सक्षमपणे काम करत आहे.’ तसेच मोदी सरकारच्या काळात १४००हून अधिक कालबाह्य कायदे रद्द केल्याचेही मोदींनी सांगितले. या सोहळ्याला छोट्या-मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकारांची उपस्थिती होती.

Web Title: Modi interacted with Bollywood

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com