मराठा आरक्षणासाठी आमदार समाधान अवताडेंची 'ही'मागणी (व्हिडिओ)

Agitation for Maratha Reservation in Pandharpur
Agitation for Maratha Reservation in Pandharpur

पंढरपूर :  मराठा समाजाला Marath Community दिलेले  आरक्षण Resrvation कायम राहावे यासाठी  राज्य सरकार Maharashtra  सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले असा आरोप करत आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे आशी मागणी पंढरपूरचे भाजपचे नुतन आमदार समाधान अवताडे यांना आज केली आहे.BJP MLA Samadhan Awatade Demads Special Session of Assembly on Marath Reservation

काल सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court of India मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाज बांधवांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयाच्या  निकाला नंतर राज्यभरात  ठिकठिकाणी आंदोलने सूरू झाली  आहेत. आज मंगळवेढा येथे आमदार समाधान अवताडे Samadhan Awtade, प्रशांत परिचारक Prashant Paricharak यांनी ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत  ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिले होते. दरम्यान  भाजपची   सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने  मराठा आरक्षणाकडे  दुर्लक्ष केले. त्यामुळेच न्यायालयात आरक्षण टिकले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही,  त्यामुळेच आरक्षणाचा कायदा रद्द झाल्याचा आरोप करत दोन्ही सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आमदार समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी केली आहे. BJP MLA Samadhan Awatade Demads Special Session of Assembly on Marath Reservation

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुममध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'अर्धनग्न मुंडन आंदोलन' केलं,  मुरूम मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून,मास्क लावून मराठा आंदोलकांनी हे आंदोलन केलं आहे. यावेळी मराठा आंदोलकांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळणार तोपर्यंत येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com