पाथर्डीमध्ये कंटेनमेंट झोन असणाऱ्या वडगावात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ !

अहमदनगर
अहमदनगर

अहमदनगर : पाथर्डी Pathardi तालुक्यात असणारे वडगाव Wadgaon प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन Containment Zone म्हणून घोषीत करण्यात आले आहे.  मात्र असे असून देखील गावातील ग्रामपंचायत Grampanchayat याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. Violation Of Social Distance In Wadgaon Which Is Containment Zone In Pathardi 

गावात असणाऱ्या रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी Crowd झाल्यामुळे कोरोना नियमांना व सोशल Social Distancing डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे चित्र समोर आले आहे. 

कोरोना Corona महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे वडगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गावामध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संख्येचा विचार करत तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.Violation Of Social Distance In Wadgaon Which Is Containment Zone In Pathardi 

मात्र रेशन Ration धान्य दुकान हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे गावामध्ये धान्याचे वितरण सुरु आहे. मात्र वडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक पातळीवर कोणत्याच प्रकारचे नियोजन न केल्यामुळे रेशन धान्य दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. 

गावातील तरूणांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून झाल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता  संबंधितांकडून याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. Violation Of Social Distance In Wadgaon Which Is Containment Zone In Pathardi 

ग्रामपंचायतीच्या अश्या प्रकारच्या ढिसाळ कारभारामुळे व हात झटकण्याचा वृत्तीमुळे नजीकच्या काळात गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची Patients संख्या वाढली तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे? असा सवाल आता गावातील तरुण करू लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com