परिवहन विभागाकडून राज्यातील रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित

Chandrapur
Chandrapur

चंद्रपूर : कोरोनाकाळात Corona रुग्णालय Hospital गाठण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी Ambulance जास्तीचे दर  Extra Fair नागरिकांकडून आकरले जात होते. याबाबतच्या तक्रारी परिवहन विभागाकडे RTO Department  करण्यात आल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेऊन चंद्रपूर पॅटर्न Chandrapur Pattern अंतर्गत राज्यभरातील रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.

तसेच रुग्णवाहिकेच्या नव्या भाडेदराची माहिती देणारे स्टीकर सर्व रुग्णवाहिकांवर लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.  यामध्ये निश्चित भाडेदराहून अधिक दर आकारणी करणाऱ्यां विरोधात आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 हे देखील पहा -

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कार्यालयाने अधिकचे दर आकारणार्या रुग्णवाहिकांच्या विरोधात कारवाई करत रुग्णवाहिकेचे भाडेदर निश्चित केले होते. त्यानंतर चंद्रपूर परिवहन विभागाचा हा पॅटर्न राज्यातील ५० परिवहन विभागात राबवण्याचे आदेश परिवहन आयायुक्तांनी दिल्याची माहिती आहे.

त्यानुसार स्थानिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकेचा प्रकार आणि रुग्णवाहिकेस कापावे लागणार अंतर आणि संबंधित अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार केलेला गेला आहे . त्यानुसार रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना ही माहिती मिळावी म्हणून भाडेदर पत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस लावणे चालक आणि मालकास बंधनकारक करण्यात आले आहे.

आरटीओ कार्यालयाने रुग्णवाहिकेच्या भाडेदरामध्ये चालकाचा पगार आणि इंधनाचा खर्च समाविष्ट केलेला आहे .त्यामुळे आता चालकाच्या दैनंदिन भत्त्यापोटी अतिरिक्त रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांकडून आकारता येणार नाही. तसेच वाहन तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि स्वच्छ ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी परिवहन विभागाने चालक आणि मालकांवर ठेवली आहे.

तसेच रुग्णवाहिकेत कोणताही तांत्रिक किंवा अन्य दोष उद्भवला, तर त्याची जबाबदारी चालक आणि मालकाची राहणार आहे . रुग्ण किंवा त्यांचा नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारे निश्चित भाडेदराव्यतिरिक्त अधिकची रक्कम वसूल केल्यास त्यांच्यावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई करण्यात येणार आहे .

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका चालक किंवा मालकांविरोधात पहिल्या गुन्हात ५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे . 

काय आहे चंद्रपूर पॅटर्न ? 

चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णालय गाठण्यासाठी रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चिती करण्याचे  काम स्थानिक परिवहन विभागानेकेले आहे. तसेच रुग्णवाहिकेच्या नव्या भाडेदराची माहिती देणारे स्टीकर सर्व रुग्णवाहिकांवर लावण्यास सुरूवात केली आहे.

पहिल्या २५ किलोमीटर किंवा दोन तासाच्या अंतरासाठी चंद्रपूर आरटीओने मारुती व्हॅनसाठी ८०० रुपये दर ठरवले आहेत . त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये दराने आकारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २५ किलोमीटर किंवा दोन तास या पहिल्या टप्प्यासाठी टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीने बांधलेल्या रुग्णवाहिकेसाठी ९०० रुपये आणि त्यानंतर प्रती किलोमीटर १५ रुपये दर आकारता येतील.

याउलट आयसीयू किंवा वातानुकूलित रुग्णवाहिकेसाठी २५ किलोमीटरपर्यंत सरसकट २ हजार रुपये आणि त्यानंतर प्रती किलोमीटर २५ रुपये भाडेदर निश्चिती केले होते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांची लूट थांबलेली होती त्यामुळे चंद्रपूर पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतलेला आहे.

Edited By : Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com