परमबीर सिंग व तेलगीचेही होते संबंध; लेटरबाँबमधला आरोप...(पहा व्हिडिओ)

Parambir Singh - Abdul Karim Telgi
Parambir Singh - Abdul Karim Telgi

अकोला : काही वर्षांपूर्वी गाजलेल्या बनावट स्टँपपेपर Stamp Paper Scam प्रकरणाचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी Abdul Karim Telgi यांच्याशीही मुंबईचे माजी पोलिस Mumbai Police आयुक्त डाॅ. परमबीर सिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप अकोल्याच्या पोलिस निरिक्षकाने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray  यांना लिहिलेल्या १४ पानी पत्रात पोलिस निरिक्षक बी. आर. घाडगे यांनी हा आरोप केला आहे. घाडगे यांनी टाकलेल्या या लेटर बाँबमुळे खळबळ उडाली आहे. Parambir Singh Shielded Stamp Scam Accused Abdul Karim Telgi

या अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande यांना हे पत्र पाठवले आहेत. त्यात परमबीर सिंग यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तेलगीशी असलेले आर्थिक हितसंबंध हा देखील या पत्रातला एक प्रमुख आरोप आहे. ''मिरारोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वजीर शेख (सध्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक कोराडी पोलीस स्टेशन,पोलीस आयुक्तालय,नागपुर ) यांनी ठाणे Thane ग्रामीणचे तत्कालिन पोलिस अधिक्षक परमबीर सिंग Parambir Singh यांना बनावट स्टँपच्या कारखान्याची माहिती देऊन कारवाई करण्याबाबत कळवले होते. मात्र, परमबीर सिंग व अन्य पोलिस अधिकाऱ्यांचे तेलगी बरोबर आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांनी बनावट स्टँपचा कारखाना जप्त केला नाही व तेलगीला अटकही केली नाही,'' असे घाडगे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

घाडगेंनी आपल्या पत्रात परमबीर यांच्यावर तब्बल २३ गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी माझ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. एस.आय.टी. SIT स्थापन करून माझ्या विरोधात दाखल केलेल्या खोट्या गुन्हयांचा Crime तपास करून दोषी अधिकाऱ्यांविरूध्द व त्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरूध्द व इतरांवर गुन्हे दाखल करून तपास करावा, अशी विनंतीही घाडगेंनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com