आंधळ्या प्रेमातून वृद्ध महिलेची हत्या

 Murder of an old woman out of blind love
Murder of an old woman out of blind love

प्रेम आंधळ असत, अस बोलल जात मात्र प्रेमा खातर एखाद्याला जिवानिशी मारन हे माणुसकीला काळीमा फासणार आहे. अशीच एक घटना भांडुप मध्ये घडली आहे. प्रेयसीने प्रियकराकडून पैशाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने एका वृद्ध महिलेच्या हत्तेचा कट केला .  (Murder of an old woman out of blind love)

या वृद्ध महिलेच्या हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर भांडुप पोलिसांनी या आरोपींचा माग काढून त्याला गजाआड केला आहे . 15 एप्रिल रोजी भांडुपच्या फुगेवाला कंपाउंड परिसरामध्ये 70 वर्षीय रतन जैन या वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती . या हत्येला महिना उलटून गेला तरी देखील पोलीस आरोपी पर्यंत पोहोचू शकले नव्हते . महिलेच्या गळ्यातील आणि घरातील मौल्यवान वस्तू देखील चोरीला गेल्या होत्या त्यामुळे एका वरिष्ठ नागरिकाच्या घरांमध्ये चोरी करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे लवकरात लवकर या आरोपी पर्यंत पोहोचण्याचा आवाहन भांडू पोलिसांसमोर होतं .

यासाठी झोन 7 मधील तब्बल 45 पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलं आणि 1060 संशयितांची चौकशी देखील करण्यात आली . अखेर याच परिसरात राहणारा इमरान मुन्ने मलिक हा 24 वर्षांचा तरुण घटना घडल्यापासून गायब असल्याचं भांडुप पोलिसांना समजलं यानंतर भांडुप पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर या तरुणाची प्रेयसी दिपाली राऊत हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं . आणि अखेर यानंतर या हत्येची उकल झाली .  इमरान यानेच या महिलेची हत्या केली असल्याचं या तरुणीने पोलिसांना सांगितलं . आणि भांडुप पोलिसांनी उत्तर प्रदेशातून इमरान याच्या मुसक्या आवळल्या . रुपाली ही सतत इम्रान याच्याकडे पैशाचा तगादा लावायची त्यामुळे पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न त्याच्यासमोर होता .

रतन या घरात एकट्याच राहत असल्याचं इम्रानला माहित होतं म्हणून त्याने रतन हिची हत्या करून तिला लुटण्याचा कट इमरान याने रचला . इमरान याने अखेर 14 एप्रिल रोजी त्याच्या घर मालकिणीने सांगितल्याप्रमाणे रतन हिच्या घरी पैसे देण्यासाठी जाण्याचा बहाणा करत संधी मिळताच रतन हे च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आणि तिच्या घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल त्याने लंपास केला.  त्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने चोरी केलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावली .  पोलिसांचा सुगावा लागताच त्याने थेट यूपी गाठलं परंतु अखेर तो पोलिसांच्या हाती लागला . भांडुप पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

हे देखिल पहा - 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com