Mistake from Fadnavis government regarding Maratha reservation
Mistake from Fadnavis government regarding Maratha reservation

मराठा आरक्षण बाबत फडणवीस सरकारकडूनच चुक- दीपेश म्हात्रे 

डोंबिवली : मराठा आरक्षणाचा कायदा तत्कालीन फडणवीस सरकार Government कडून चुकीचा मांडल्याने सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला आणि त्याचे खापर जाणीवपूर्वक ठाकरे सरकारवर भाजपकडून BJP फोडले जात आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेना ShivSena युवासेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. Mistake from Fadnavis government regarding Maratha reservation

सुप्रीम कोर्टाने Supreme Court राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. आणि या अपयशाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येते आहे.

हे देखील पहा -

तसेच खापर ठाकरे सरकारवर फोडले जात आहे. पण हे पुर्णतः चुकीचे आहे. मराठा आरक्षणाचा कायदा तत्कालीन फडणवीस Fadnavis सरकार कडूनच चुकीच्या पद्धतीने मांडल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले असे शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हंटले आहे.

म्हात्रे यांनी सांगितले की मी ओबोसी समाजाचा असलो, तरी मराठा समाजातील तरुणांसोबत नेहमीच असतो. मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण मिळणे गरजेचे असून मी त्यांच्यासोबत आहे. पण राज्य आणि केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष देण्याची आता खरी गरज असल्याचे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com