कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

सरकारी आणि खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना विषाणू चाचण्या मोफत करण्याचा अंतरिम आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोनाच्या चाचण्या नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिबरेशन (एनएबीएल) यांच्याकडून प्रमाणित असलेल्या लॅब किंवा जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून प्रमाणित केलेल्या एजन्सीकडूनच कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. 

खासगी लॅबकडून चाचण्यांसाठी आकारण्यात येणारे 4500 रुपये परवडणारे नाहीत, असेही घटनापीठाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या घटनापीठाने आजचा अंतरिम आदेश दिला आहे. अॅड. शशांक देव सुधी यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केलेली आहे.

Web Title - marathi news Supreme court orderd that corona test should be free for all

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com