VIDEO | यासाठी वाईन शॉप्स सुरु करायला परवानगी द्या-राज ठाकरे

VIDEO | यासाठी वाईन शॉप्स सुरु करायला परवानगी द्या-राज ठाकरे

राज्याची महसुली तूट भरून काढण्यासाठी वाईन शॉप्स सुरु करायला परवानगी द्या, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. त्यांनी तसं पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलंय.

कोरोनामुळे सध्या देशासह राज्यभरात लॉकडाऊन आहे. राज्यात सगळीकडे हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप्स बंद आहेत. त्यामुळे राज्याचा कोट्यवधींचा महसूल ठप्प झालाय. परिणामी राज्याच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसलीय. हे लक्षात घेता, राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी वाईन शॉप्स सुरु करायला हरकत काय, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रच लिहिलंय. 
'राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळे महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळे कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,'
अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. 'दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा आपल्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलंय.

लॉकडाऊनमुळं निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी दारूच्या उत्पादन आणि विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाकडं सरकारचं लक्ष वेधलंय. 
'दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. यावरून सरकारला होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या महसुली तोट्याचा विचार व्हायला हवा. टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळे राज्याच्या महसुलासाठी सरकारनं वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
याचबरोबर, मुंबईसारख्या शहरात गरज बनलेल्या हॉटेल, खानावळी आणि पोळी-भाजी केंद्रांना पार्सल सेवा सुरू करायला परवानगी द्या, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केलीय. 'खानावळी आणि काही हॉटेलांमध्ये माफक दरात मिळणाऱ्या 'राईसप्लेट्स'वर राज्यातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यांनाही यातून आधार मिळेल. हॉटेलातल्या कर्मचाऱ्यांचा रोजगार सुरू होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात धुगधुगी निर्माण होईल, असंही राज यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com