फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण

फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण


नवी दिल्ली : 'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बहुमत चाचणीबाबत निर्णय दिला. उद्याच बहुमत चाचणी होणार, आणि आम्ही आमचे बहुमत सिद्ध करणार. त्यामुळे फडणवीसांनी उद्याऐवजी आजच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,' असे काँग्रेसचे मेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. 

फडणवीस सरकारला झटका; उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत

भाजप उद्या बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्यांच्याकडे तितके आमदाच नाहीत. पण काल आम्ही आमच्या आमदारांची ओळख परेड केली. आमच्याकडे 162 आमदारांच्या सह्यांची कागदपत्रे आहेत. त्यामुळे आम्हीच उद्या सत्तास्थापन करणार, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तर शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी सांगितले की, आम्ही शनिवारी रात्री याचिका दाखल केली. मंगळवारी निकाल आला व उद्या (ता. 27) बहुमत चाचणी होईल. सर्वोच्च न्यायालयाने आज म्हणजेच संविधानदिनादिवशी हा निकाल दिल्याने महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला आहे. भाजप बहुमत चाचणी सिद्ध करू शकत नाही.


सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, की संविधान दिनी देशाला मिळालेले हे गिफ्ट आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. रविवारी आणि सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेतली. न्यायालयाने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. एकही आमदार आम्ही स्वाक्षऱ्यांच्या आधारे भाजपसोबत असल्याचे सांगत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आली होती. लोकशाहीच्या दिवसातील हा काळा दिवस होता.

महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.  

Web Title: Prithviraj Chavan demands for resignation of CM Devendra Fadnavis

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com