महाविकास आघाडीचं सरकार येणं हे सर्वस्वी मोदींच्या हातात ?

The next government its all in the hands of Modi
The next government its all in the hands of Modi

महाविकासआघाडीने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या मॅजिक फिगरची जुळवाजूळव केलीय. मात्र तरीही महाविकासआघाडीचं सरकार अस्तित्वात येणं हे सर्वस्वी मोदींच्या भूमिकेवर अवलंबून असेल.

येत्या दोन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असं जरी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उच्चारवाने सांगत असले तरीही सरकार स्थापनेचा निर्णय़ सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर अवलंबून असेल. याशिवाय़ राज्यपालांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.

सत्ता स्थापनेचा दावा ते नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा प्रवास जरी सोपा वाटत असला तरीही भाजपसोबतचे शिवसेनेचे दुरावलेले संबंध पाहता ही प्रक्रिया वेळकाढूपणाची ठरू शकते. सत्ता स्थापनेचा दावा करण्यापुर्वी तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडीच्या नेत्याची निवड करावी लागेल. या नेत्याद्वारे तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या सह्या असलेलं पत्र राज्यपालांना देऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा लागेल. यानंतर बहुमताची खात्री पटल्यास राज्यपाल महाविकासआघाडीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करू शकतात. मात्र राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने नव्या सरकारचा शपथविधी होण्यापुर्वी राष्ट्रपती राजवट उठवावी लागेल. इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण राष्ट्रपती राजवट उठवायची झाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे.

मात्र सध्या शिवसेनेसोबत भाजपचे ताणलेले संबंध पाहता राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या प्रक्रियेत जाणीवपुर्वक विलंब केला जाऊ शकतो. याशिवाय राज्यपालांचे निर्णय हे बऱ्याचदा केंद्र सरकारच्या सोयीने घेतले जातात, हा आजवरचा अनुभव पाहता ऐनवेळी राज्य़पालही सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून खोडा घालू शकतात. एकूणच ही सगळी पार्श्वभूमी पाहता महाविकासआघाडीच्या सरकारचं भवितव्य मोदींच्याच मर्जीवर अवलंबून असेल, हे नक्की. \

Web Title - The next government its all in the hands of Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com