मटण, मासे महागले! वाचा काय आहेत सध्याचे दर?

मटण, मासे महागले! वाचा काय आहेत सध्याचे दर?

नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात निघालात,आणि माशांवर ताव मारण्याचा तुमचा बेत असेल तर तुमचं बजेट वाढवा कारण तुमच्या ताटातले मटण, मासे महागलेत

मासे मग ते कोणतेही असोत, सुरमई, पापलेट,बांगडा,कोळंबी फ्राय असो की रस्सा. पाहताच क्षणी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. कोकणात येणाऱ्या अनेक पर्यटकांचा मासे हा तर विक पॉईंट. मात्र ऐन नाताळाच्या सुट्टीत मासे महागलेत. विशेषकरुन सुरमई आणि पापलेटच्या दरात मोठी वाढ झालीय.

माशांचे सध्याचे आणि पूर्वीचे दर

मासे                   पूर्वीचे दर     आताचे दर

सुपर पापलेट           900          1100  
मोठे पापलेट           1000         1300
सुरमई                    500           600
मोठी कोळंबी           450            500
लहान कोळंबी          100           150
बांगडा                    250            300
घोळ मासा               550           600

प्रदूषण आणि वादळाचा मासेमारीवर मोठा परिणाम झालाय...त्यामुळंच मासळीचे दर वाढल्याचं सांगितलं जातंय

मासे महागले म्हणून मटणाचा विचार करत असला तर त्यासाठीही तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मटणाचे दर किलो मागे 600 रुपयांवर गेलेयत. काही दिवसांपूर्वी हा दर 500 रुपये होता

नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही कोकणात जाणार असाल आणि माशांवर अथवा मटणावर मनसोक्त ताव मारण्याचा बेत तुमचा बेत असेल तर जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवा. 

Web Title - marathi news Moton, fish rates hike in these days...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com