मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी ; आता पुण्यात मिळणार घरपोच देशी दारू

Liquor
Liquor

पुणे - वाईन,व्हिस्की यासह देशी दारूहीचीही liquor आता होम डिलिव्हरी  home delivery करण्यासाठी राज्य सरकारने state government परवानगी दिली आहे. मद्याची वाहतूक करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. home delivery of desi liquor in pune

राज्य सरकारने ब्रेक द चेन चे आदेश काढताना मद्यविक्री होम डिलिव्हरी मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदेश प्रसिद्ध केले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी होम डिलिव्हरी सुरू झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी आदेश प्रसिद्ध केले आहेत.

त्यानुसार आता वाईन शॉप, बिअर शॉपी (एफएल २), बिअर बार (फॉर्म ई), वाईन शॉपी (फॉर्म ई २), देशा दारू (सीएल ३) आता ग्राहकांना होम डिलिव्हरीच्या माध्यमातून घरबसल्या मिळणार आहे. मूळ किंमतीत (एमआरपी) ही मद्यविक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बारमधून या पूर्वीच होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. home delivery of desi liquor in pune

वाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारू दुकानदारांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानावर लावायचा आहे. त्यावर ग्राहकांनी संपर्क साधून आपली ऑर्डर नोंदवायची आहे. दुकानदारांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांची उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

त्यांच्यामार्फतच ग्राहकांकडे ऑर्डर पुरविली जाणार आहे. तसेच ग्राहकांकडे मद्य सेवन करण्याचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना डे लायसन (एक दिवसांचा मद्य सेवनाचा परवाना) पाच रुपयांत घ्यावे लागणार आहे. संबंधित वाईन शॉपमधूनही डे लायसन ग्राहकांना मिळेल.अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे prasad surve यांनी दिली. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com